गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
कारंजा : सुदृढ आरोग्यासाठी २९ सप्टेंबर रोजी अमरावती येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत कारंजा शहरातील तब्बल १३९ स्पर्धक सहभागी होवून रस्त्यावर धावणार आहे.अमरावती येथे दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. यावर्षी सुद्धा ही स्पर्धा २९ सप्टेंबर रोजी होत असून, गतवर्षी शहरातील धावपटू मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही प्रथा यावर्षी कायम ठेवण्यासाठी या स्पर्धेतील २१ किलोमिटर धावण्याच्या गटात शहरातील ९ स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे.१० किलोमिटर धावण्याच्या गटात ३० तर ५ किलो मिटर धावण्याच्या स्पर्धेत १०० स्पर्धकांनी आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. हे सर्व स्पर्धक सकाळी अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर उतरून येथून नियोजित वेळेनुसार अमरावतीच्या रस्त्यावर धावण्यासाठी सुटणार आहेत. दरम्यान, उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी शहरातील धावपटूंना खऱ्या अर्थाने मॅरेथॉन स्पर्धेची ओळख करून दिली. त्यामुळे शहरात आता बरेच धावपटू तयार होवू लागले असून, मॅरेथॉनची ही चळवळ डॉ. अजय कांत व त्यांचे सहकारी नेहमी परिश्रम घेत असतात.





Social Plugin