Ticker

6/recent/ticker-posts

धामणगाव येथील शेतकरीपुत्राची भारतीय सैन्य दलात निवड.



वसमत (दि.27)- धामणगाव येथील दत्ता सुदामराव भुतकर याची नुकतीच भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. या निमित्ताने सर्व गावकऱ्यांच्या वतीने गावामध्ये जल्लोषात स्वागत करून दत्ता भुतकर व त्याच्या आई वडिलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

         दत्ताचे प्राथमिक शिक्षण धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण गोरखनाथ विद्यालय येथे झाले. दत्ताने भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्यासाठी त्याने नियमितपणे मेहनत घेतली आणि आपले स्वप्न सत्यात उतरवले. येणाऱ्या काळात देशसेवेचे स्वप्न पाहणारे गावातील अनेक तरुण दत्तापासून नक्कीच प्रेरणा घेतील. दत्ताने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.