Ticker

6/recent/ticker-posts

मत्स्योदरी देवी संस्थानच्या वतीने २०३ दुकान जागेचे वाटप


 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

अंबड शहराचे श्रद्धास्थान श्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या वतीने नवरात्र महोत्सव २०२४ साठी ३५० पैकी २०३ दुकानांना जागेचे वाटप मंगळवारी दि.२४ रोजी करण्यात आले यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत ही जागा वाटप करण्यात आली. 

संस्थानला २०३ दुकानांतून ०७ लाख ०५ हजार रुपयांचे उत्पन्न नवरात्र महोत्सवानिमित्त संस्थानास प्राप्त झाले आहे. दुकान जागेचे वाटप संस्थानचे सचिव तथा नायब तहसीलदार श्रीमती धनश्री भालचिम, संस्थानचे विश्वस्त तथा पुजारी गीताविलास कुंटेफळकर, संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांच्या उपस्थित करण्यात आले.याप्रसंगी संस्थान कर्मचारी नामदेव राठोड, गोविंद कायस्थ, दिगंबर खरात,मुकेश गोसावी,दळवी दाजी अर्जुन शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.