अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याच्या सुरुवातीपासून राष्ट्रीय समाज पक्षाशी एकनिष्ठ असलेले व मा.श्री.मा.कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे अंबड येथील श्री सचिन भाऊ खरात यांची जालना जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.काशिनाथजी शेवते, मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य मा.ज्ञानेश्वरजी सलगर, राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश चितळकर,मराठवाडा अध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांच्या आदेशानुसार श्री सचिन भाऊ खरात यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.अंबड तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाला अधिक बळकटी मिळण्यासाठी श्री सचिन भाऊ खरात यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे.तालुका व जिल्हा स्तरावर घडणाऱ्या अनिष्ट घटनांचा प्रवृत्ती विरोधात आवाज उठवताना श्री सचिन भाऊ खरात नेहमी पुढाकार घेताना पहायला मिळत असतात.त्यामुळे त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे.प्रसार व वृत्तपत्रांच्या माध्यमांनी त्यांच्या कार्याची अनेकवेळा दखल घेतली आहे.
राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते सक्रिय आहेत.अंबड तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमाणिक आणि एकनिष्ठ असल्याने सामान्य,साधी राहणीमान,स्मितभाषा, परोपकारी कोणत्याही क्षणी मदतीला धाव घेण्याची तयारी या त्यांच्या कामामुळेच श्री सचिन भाऊ खरात यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.नेहमीच सतर्क असलेल्या श्री सचिन भाऊ खरात यांची पक्षनिष्ठा व कार्यप्रणालीची दखल घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा.काशिनाथजी शेवते, मुख्य महा सचिव महाराष्ट्र राज्य मा.ज्ञानेश्वरजी सलगर, राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश चितळकर,मराठवाडा अध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांनी श्री सचिन भाऊ खरात यांना नियुक्तीपत्र देऊन यांची जालना जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे
.याबद्दल श्री सचिन भाऊ खरात यांची निवड होताच त्यांच्यावर सर्व स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राजकीय क्षेत्रात काम करत असताना श्री सचिन भाऊ खरात यांनी सामाजिक कामात कधीच कसर सोडली नाही.पक्ष आदेशाचे पालन करुन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे.सामाजिक स्तरावर समाज कार्यासाठी श्री सचिन भाऊ खरात यांचा मदतीचा एक हात पुढे सरसावतांना नेहमी दिसून येतो.राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करत असताना सर्व समाजातील लोकांना व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन कोणताही मतभेद न करता काम करत आहेत कोणत्याही क्षणी मदतीला धावणाऱ्या श्री सचिन भाऊ खरात यांचा जिल्ह्यात जनसंपर्क वाढत आहे.श्री सचिन भाऊ खरात यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच जिल्ह्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रातून श्री सचिन भाऊ खरात यांचे अभिनंदन केले जात असून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.





Social Plugin