बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे महानुभाव पंथाचे चौथै श्रीकृष्ण भगवान श्री गोविंद प्रभु अवतरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षीय भाषण करताना महंत श्री गोविंदराज शास्त्री गुर्जर म्हणाले की,नवशे वर्षापुर्वी श्री गोविंद प्रभु बाबांनी सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली.जो वंचित,शोषित,पिडलेला तळागाळातील बहुजन समाज आहे.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.दिन दुबळ्या जीवांना दुःखातून मुक्त केले.त्यांची सेवाभावी वृत्ती आत्मसात करण्याची गरज आज समाजाला आहे.
प्रास्ताविक मनेश टोपे यांनी केले तर ब्रम्हविद्या अभ्यासक श्री दिगंबर झांजे,सुनिल दखने यांनी आपले विचार मांडले.स्वप्निल दखने यांनी आभार प्रदर्शन केले.याप्रसंगी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.अनिल घाडगे,सारंग दखने,भारत कोटंबे,अनिल भागवत,बंडू लाड,भागवत दखने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सद्भक्त उपस्थित होते.





Social Plugin