Ticker

6/recent/ticker-posts

ढगफुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई खात्यात जमा



प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर

मंगरुळपिर--तालुक्यातील कवठळ सर्कल मधील गिंभा, मोहरी या गावात ढगफुटी झाली होती व घरांची पडझड झाली होती त्यावेळी उबाटा शिवसेना विदर्भ नेते लोकप्रिय खासदार श्री संजयभाऊ देशमुख यांनी पाहणी केली होती तसेच प्रशासन ला फोन करून त्वरित मदत द्यावी असे आदेश देण्यात आले होते.त्यांची पडताळणी करून पंचनामा करून प्रशासनाने आज रोजी त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली आहे.खासदार संजयभाऊ देशमुख यांचे मंगरूळपीर तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, उपतालुकाप्रमुख भागवत शिंदे, ॲड.अनिल पवार, सर्कल प्रमुख संगम कुरवाडे, गजानन गदाने, गोपाल राऊत,सुरज मिटकरी,प्रविण मिसाळ, सर्व महाविकास आघाडी तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम च्या वतीने उबाठा लोकप्रिय खासदार श्री संजयभाऊ देशमुख यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन केले आहे.