Ticker

6/recent/ticker-posts

कर्मवीर अण्णांनी समता, बंधुता श्रम प्रतिष्ठा, मूल्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली-नवनाथ जगदाळे



पुसेगाव दि .[प्रतिनिधी ] 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी याचे संस्कार शिक्षणातून दिले. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे  मध्य विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे यांनी केले.     पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७  वा जयंती सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. ‌ अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे दहिवडी कॉलेज, दहिवडी. होते.प्रमुख पाहुणे श्री. नवनाथ जगदाळे , व्यासपीठावर प्रा.सौ.नंदिनी साळुंखे, श्री. सुंदरगिरी महाराज, श्री.संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, श्री सेवागिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सावंत, पर्यवेक्षक  सावंत, प्रा.डॉ. संजय क्षीरसागर लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था, सातारा, श्री अजय दिघे लाईफ वर्कर, रयत शिक्षण संस्था, सातारा. प्रा.डॉ. अनिल जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.                 

      जगदाळे आपल्या भाषणात पुढे  म्हणाले,'कर्मवीर अण्णांनी अन्याच्या विरुद्ध आवाज उठविला कर्मवीर अण्णांवर सत्यशोधकी विचारांचा प्रभाव होता. विविध जाती, धर्माच्या विद्यार्थ्यांना एकाच वस्तीगृहात शिक्षण देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील गोरगरीब, बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. प्रसंगी प्रा.सौ.नंदिनी साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान सांगत असताना युवकांमध्ये श्रम संस्कृतीचा विकास कसा होईल या दृष्टीने श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले . श्री. संतोष उर्फ बाळासाहेब जाधव आपल्या मनोगतात म्हणाले, 'कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारी खुली करून दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांची शिक्षणाची सोय झाली. अध्यक्षीय  मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे म्हणाले,'कर्मवीर अण्णांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थेत संस्कारशील व चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडत आहे.

 अण्णांना अभिप्रेत असणारे समाज प्रबोधन, समाज परिवर्तन करण्यात   रयत शिक्षण संस्थेचा मोठा वाटा आहे. असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सांगितला. श्री सेवागिरी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मुख्याध्यापक श्री. अशोक सावंत यांनी सांगितला ,१०८प.पू. श्रीमंत सुंदर गिरी महाराज, मठाधिपती श्री. सेवागिरी महाराज देवस्थान, पुसेगाव यांनी आपल्या  मनोगतातून विचार सांगून सर्वांना आशीर्वाद दिला.कु.संस्कृती कदम या विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री सेवागिरी विद्यालयातील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर. धोंगडे, श्री. आर.व्ही गोरे यांनी केले. आभार प्रा.सौ. गोडसे एस.टी. यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील व  श्री सेवागिरी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 छायाचित्र - पुसेगाव .श्री सेवागिरी विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना  नवनाथ जगदाळे, प्राचार्य डॉ‌ सुरेश साळुंखे, प्रभारी प्राचार्य डॉ.  आर.पी.भोसले,१०८प.पू. श्रीमहंत सुंदरगिरी महाराज,प्रा.सौ. नंदिनी साळुंखे, श्री संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, प्रा.डाॅ. संजय क्षीरसागर व इतर उपस्थित मान्यवर छाया - प्रकाश राजेघाटगे बुध