Ticker

6/recent/ticker-posts

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.


तालुका प्रतिनिधी शंकर निंबारे देवडोंगरी 

  ओझरखेड | ‘साहस’ शैक्षणिक सामाजिक सेवाभावी युवा संगठन संस्थेमार्फत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात - पालघर जिल्ह्याच्या सिमावर्ती दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक शाळेसह आश्रम शाळेत संस्थेने आगळावेगळा उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमासाठी बोरीपाडा, काथवडपाडा, घरटापाडा, घोडीपाडा, सादडपाणा, पंगारपाणा, कुतरमाळ, चामेनमाळ, बेरवळ, हिवाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंसह रावजी कामठी आश्रम शाळा ओझरखेड या शाळेंचा समावेश असुन एकूण ५०० गरजु विद्यार्थ्यांना दप्तरासह शैक्षणिकपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. 


   साहस शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी युवा संगठन हि संस्था बोरीवली मुंबई येथील असुन मागील कोरोणाची दोन वर्षे वगळता या दुर्गम आदिवासी भागात सलग आठ वर्षांपासून सातत्याने साहस संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून साहस संस्थेचे मार्गदर्शक तथा अध्यक्ष भूषण परब यांच्या नेतृत्वनाखाली संस्थेचे सचिव सौ. उर्मिला परब, विद्यमान सदस्य- रामचंद्र धुमक, अरविंद शर्मा, दयानंद सावंत, कु. दिपाली नाचरे, चि. युवराज परब आणि पालकत्वाच्या नातेने तसेच अनुभवाने श्रेष्ठ असलेले आदरणीय रमाकांत परब आदी उपस्थित होते. 


   सदर उपक्रमाचे सातत्य आणि बहुपयुक्तता लक्षात घेता शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत साहस परिवाराचे आभार मानले. यावेळी साहस परिवाराच्या शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, ह्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवी अश्या शैक्षणिक टप्पेतील आदिवासी समाजातील गरजू मुलामुलींसाठी त्यांच्या वयानुरूप "संस्कार, शिक्षण तसेच कौशल्याधारित व रोजगाराभिमुख प्रशिक्षणातून स्वावलंबन" अश्या विविधयुक्त पैलूंवर प्रभावदर्शी कार्य भविष्यात उभे करण्याचा आमचा मानस व प्रामाणिक प्रयत्न असेल, असे साहस परिवाराचे अध्यक्ष श्री. भूषण परब यांनी सांगितले.


   या सामाजिक उपक्रमांसाठी बेरवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा साहस संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश मौळे तसेच चिंचओहोळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रल्हाद बोरसे यांच्या विशेष सहकार्या लाभले तसेच उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते यशोदाताई महाले, रंगूबाई बोथरणे, योगिताताई मौळे, नामदेव टोकरे, दशरथ किरकिरे, गोविंद जांजर, सुरेंद्र किरकिरे, तुषार महाले आदींनी परिश्रम घेतले.