बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री नागनाथ माध्य.व उच्चमाध्यमिक विद्यामंदिर बुध माजी विद्यार्थिनी शितल इरफान आवटे (तांदुळवाडकर ) व श्री इरफान आवटे यांनी 72000 रुपये खर्च करून विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही संच व आठ कॅमेरे विद्यालयाची मागणीनुसार भेट दिले .यावेळी प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांनी शितल आवटे यांचे आई वडील अरविंद परशुराम तांदुळकर व अलका अरविंद तांदुळवाडकर यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
तसेच प्रसिद्ध व्यापारी व विद्यालयाचे माजी विद्यार्थी .नितीन गाडे बुध विकास सोसायटीचे व्हॉइस चेअरमन व बुध ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांनी विद्यालयासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेला एच पी कंपनीचा 14500 रु किंमतीचा प्रिंटर भेट दिला .त्याबद्दल त्यांचे पर्यवेक्षक श्री दडस नाना यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले .यासाठी माजी प्राचार्य शेखर घाटगे यांची सहकार्य मिळाले .शितल आवटे व इरफान आवटे यानी पुण्याहून श्री अतुल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या परिसरामध्ये सीसीटीव्हीचे कॅमेरे सर्व सोयीनीयुक्त बसविले .अतुल जोशी सर यांचा लेखनिक संजय पवार तसेच बजरंग व दिगंबर मदने या कर्मचाऱ्यांचा नितीन नारागुडे यांनी सत्कार केला . दात्यांशी विद्यालयातील सहशिक्षक भगवान सरवदे संपर्कात राहुन प्रयत्न केले .प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या सुविधेसाठी सहकारी शिक्षक प्रयत्न करत आहेत .दोन्ही दांत्यांचे विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन केले . तसेच सरपंच सुजाता बोराटे उपसरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयराजे घाटगेआणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी शितल आवटे व इरफान आवटे तसेच नितीन गाडे यांचे अभिनंदन केले .





Social Plugin