Ticker

6/recent/ticker-posts

वाई तालुक्यातील तलाठी संघटनेने तहसीलदारांना दिले निवेदन


        महसुल कर्मचाऱ्यावरील हल्ले कधी कमी होणारं??? आरोपीला फाशी द्या.

वाई प्रतिनीधी,राहुल पिसाळ 

                           हिंगोलीत एका तलाठी कर्मचाऱ्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. संतोष पवार असं मृत तलाठीचं नाव आहे. त्यांच्या हत्येनंतर राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहे.राज्यभर काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. वाई तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोqरही महसूल विभागातील संघटनांच्या वतीने संतोष पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले 

वाई तहसीलदार कार्यालयासमोर महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. वाई च्या तहसिलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे त्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले त्यावेळीं वाई तलाठी संघटनेचे अध्यक्ष गणेश आंबटवाड, उपाध्यक्ष संकेत साळुंखे,सचिव निलेश भोसले, तलाठी आधीक कदम, संदिप फासगे, संतोष जगताप मंडल अधिकारी प्रशांत इंगवले, लतिका कोरडे आणि इतर संघेटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .