प्रतिनिधी - जयदीप लोखंडे
वैजापूर 29 ऑगस्ट - बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू वरील अत्याचाराच्या घटना आणि रामगिरी महाराजांचे समर्थनार्थ रामगिरी महाराजांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या तसेच शहरातील कत्तल खाने बंद करा या कारणासाठी आज वैजापूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वैजापूर शहरात कलम 144 लागू करण्यात आलेले असल्यामुळे मोर्चा 2 वेळा पूढे ढकलण्यात आला होता
तसेच मोर्चा मुळे शहरातील वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला होता, मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता व महाराणा प्रताप यांच्या पुतळ्या पासून तहसील कार्यालय पर्यंत मोर्चाचा मार्ग होता तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस मोठे स्टेज उभारून त्या ठिकाणी विविध मान्यवारांनी भाषण केले व उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड आणि तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देण्यात आले.





Social Plugin