Ticker

6/recent/ticker-posts

पोळ्याच्या दिवशीच वाघडू येथे शेतकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यु



प्रतिनिधी दीपक गुरव@     चाळीसगाव 

चाळीसगाव- बैलपोळ्याची सर्वत्र आनंदात साजारा होत असतांनाच ४८ वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील वाघडू येथे घडली. या घटनेने पोळपाच्या सणावर दुःखाची छाया पसरली.

वाघडू येथील शेतकरी साहेबराव भिमराव पाटील (४८) हे सोमवार दि.२ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यास गेले असता त्यांचा शेतातील विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यु झाला. वडिल घरी आले नाही म्हणून मुलगा त्यांना पाहण्यास गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच गावकळ्यांनी शेताकडे धाव घेत साहेबराव पाटील यांना विहीरीतून बाहेर काढून गनौण रुग्णालयात नेल. तेथे वैद्यकीय अधिकान्यांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी बबनराव बाजीराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

शेतकन्यांच्या जिव्हाळ्याचा पोळ्याचा सण सोमवारी साजरा होत असतांनाच शेतक-याचा विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यु झाल्याने वाघडू परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.