प्रतिनिधि जिशान सय्यद
मंगरूळ:. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. जिल्ह्यात दोन दिवसांपासून अतिवृष्टीने थैमान घातले असून नायगाव विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेली पिके पाण्यामुळे वाहून गेली आहेत,घरांची पडझड व अन्य नुकसानही झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणीसाठी नायगाव तालुक्यातील पाटोदा(त.ब.),बरबडा,मांजरम येथे उपस्थित राहून पाहणी केली.
नायगाव तालुक्यातील बाधित गावातील शेती व पिकांची पाहणी करता शेतकऱ्यांच्या पिकांचे जवळपास शंभर टक्के नुकसान झाल्याचे पंचनामे करताना सरसकट नुकसान दाखवून शेतकरी बांधवांना अधिकाधिक भरपाई मिळवून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठ पुरावा करणार असा विश्वास दिला.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सतर्क राहून आपल्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत तक्रारी देणे अनिवार्य आहे.यासाठी ऑनलाईन पद्धतीत असणाऱ्या जाचक अटी काढून टाकाव्या व शेतकऱ्यांना ऑफलाई पद्धतीने अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
नजरचुकीचे कोणत्या शेतकऱ्यांने पिक विमा भरला नसेल तर त्यालाही ही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रशासन स्तरावर प्रयत्न करणार असा विश्वास यावेळी दिला.





Social Plugin