Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात सकल मराठा समाजाचा कडकडीत बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला



  प्रतिनिधी :- सचिन ठुले 

मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांनी गेल्या पाच दिवसापासून अंतरवेली सराठी येथे आमरण उपोषणास सुरवात केली आहे. तरी ही राज्य सरकारने अधाप कोणतीही दखल घेतली नसल्याने उपोषणाच्या समर्थनास रविवार 22 सप्टेंबर रोजी जिल्हा बंद ची हाक दिली होती. या बंद ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या बंद च्या पाश्र्वभूमीवर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन चाल ढकल   केली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अंतरवेली सराटी येथे आमरण उपोषणास सुरवात केली आहे. पण आता त्यांची  प्रकृती  दिवसेन दिवस ढासळत चालली आहे. याकडे शासनाचे पुर्णतः दुर्लक्ष होत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यात ठिक ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहेत. परभणी जिल्हातील समाज बांधवांनी रविवारी जिल्हा बंद ची हाक दिली होती. त्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील मुख्य बाजार पेठ कडकडीत बंद होती.व ठिक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नसुन हा बंद शांततेत यशस्वी झाला.