Ticker

6/recent/ticker-posts

बंद नलिका कॅनल ठरली शेतकऱ्यासाठी डोकेदुखी वसंतवाडी येथील शेतकरी करणार दि.25 ला जिल्हाधिकारी कार्यालय ला उपोषण



(प्रतिनिधी) ईश्वर पवार 

      वारा धरण प्रकल्पावरील बंद नलिका पाणी वितरण कॅनल पायाभूत सुविधा अभावी शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरली आहे असे आरोप गावातील शेतकऱ्यांनी केलं आहे संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे अश्या विविद  मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम  व संबंधित लघु पाटबंधारे विभाग वाशिम यांना केले आहे मागणी मान्य न झाल्यास  वसंतवाडी येथील शेतकरी करणार दि.25 ला जिल्हाधिकारी कार्यालय समोर वाशिम ला उपोषण करण्याचे निवेदन दिले आहे 

        शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार लघु पाटबंधारे विभाग वाशिम यांच्या अधिपत्याखाली  बंदनलिका कॅनॉलचे काम  केले आहे हे काम करीत असताना शेतकऱ्याच्या शेतातील उभे पिकाचे खूप मोठे नुकसान करण्यात आले व लवकरच त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही संबंधित पाटबंधारे विभाग यांनी दिली पण मात्र आज वर्ष होऊनही एक पैसाही शेतकऱ्याला देण्यात आला  नाही कॅनल करीत असताना शासनातर्फे खूप मोठा खर्च केला जातो जास्तीत जास्त शेतकऱ्याची शेत जमीन सिंचनाखाली यावी असे प्रयत्न केले जातात पण इथे मात्र वेगळेच दिसत आहे नकाशा नुसार सिंचनाखाली आलेले क्षेत्रफळ ही ओलीत (सिंचित )होईल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे याचे कारण ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणी घेण्यासाठी दिलेले गेट (वाल ) तेथून पाटसरच नाही किंवा पाईपही नाही मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल याविषयी शंका निर्माण झालेली असून हे कॅनल फसवी तर नाही ना? असे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून नाराजीचे सूर उमटले आहे 

   वरील सर्व बाबी जिल्हाधिकारी महोदया यांच्या लक्षात आणून दिल्या असता लवकरच याविषयी संबंधित यंत्रणा व शेतकरी यांची संयुक्त बैठक लावून उपायोजना विषयी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मा. जिल्हाधिकारी यांनी दिले यावेळी गावातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पायाभूत सुविधा म्हणून खालील मागण्या केल्या 1) बंदनलिका कॅनॉल प्रणालीला ये जा करण्याकरिता कॅनलला लागून रस्ता असावा  2) काम करीत असताना पिकाचे झालेले नुकसानीचे पैसा तात्काळ खात्यावर जमा करण्यात यावा 3) लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाईप द्वारे त्यांच्या शेतापर्यंत बेंड(पाणी ) काढून देण्यात यावे 4) ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मुख्य कॉक बसवण्यात आला आहे ही जमीन संपादित करून घ्यावी अशा सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावातील शेतकरी प्रदीप राठोड,सुधाकर महाराज, निखिल जाधव, कुंडलिक राठोड व गावातील इतर शेतकऱ्यांनी केली आहे मागणी मान्य न झाल्यास दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे