वाई प्रतिनीधी
भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव काळात गणेश मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणेसह लेझर लाइटला पूर्ण बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दि .३०/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिली आहे.भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक पोलिस ठाण्यात घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते. त्या वेळी सहायक पोलिस निरीक्षक विशाल भंडारे भुईंज हद्दीतील विविध गावचे पोलिस पाटील व सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. गर्जे म्हणाले, “सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाने घालून दिलेल्या आदर्श नियमावलीची अंमलबजावणी करावी. परवान्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरावेत, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे मंडळाची नोंद करावी,पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेतच गणेशविसर्जन मिरवणूक काढावी. उत्सवानिमित्ताने सामाजिक ऐक्य व सलोखा वाढीस लागेल, अथवा देशभक्तिपर देखावे उभे करावेत. ध्वनिक्षेपकामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. मिरवणुकीच्या वेळी इतर धर्मीयांच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जादा वेळ मिरवणूक रेंगाळत ठेवून गुलालाची उधळण करू नये. मिरवणुकीत जातीय सलोखा भंग होईल, अशा प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा गणेशोत्सव अफवा पसरविल्या जाणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांवर कायदेशीर कारवाई येईल.मिरवणुकीत मद्यपान करून नृत्य होणार नाही, ठरवून दिलेल्या वेळेतच ध्वनिक्षेपकाचा मानांकनातच वापर करावा. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लागू असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे तसेच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व अंमलदार, होमगार्ड यांनी दिलेल्या सूचना तसेच आदेशाचे तंतोतंत पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे."
One attachment
ail
.jpg)




Social Plugin