Ticker

6/recent/ticker-posts

त्र्यंबकेश्वर तालुक्यात विधानसभेसाठी हालचाली सुरू.


इगतपुरी/त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी दादा गट आग्रही.

तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे

   इगतपुरी /त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटाने मोर्चे बांधणी सुरू केली असून या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये इगतपुरी/ त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडविण्यासाठी एक मुखाने ठराव मंजुर करण्यात आला. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,तालुकाध्यक्ष बहीरू पाटिल मुळाणे, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, शहराध्यक्ष बंडू खोडे, जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष गोकुळ बत्तासे, जिल्हाध्यक्ष सरचिटणीस आनंद कसबे आदी उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी कार्यकर्तेंना मार्गदर्शन करून विधानसभेची जागा ही राष्टवादीलाच सुटणार असुन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश दिले. तसेच तालुकाध्यक्ष बहीरूपाटिल मुळाणे यांनी राष्टवादीस जागा  मिळाल्यास निश्चितच या जागेवर आपला विजय निश्चित होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, शहराध्यक्ष बंडू खोडे, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बत्तासे, जिल्हाध्यक्ष सरचिटणीस आनंद कसबे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष देवा बेंडकोळी, विधानसभाध्यक्ष हिमांशु देवरे,महीला तालुकाध्यक्ष भारती खिरारी, युवक शहराध्यक्ष वेदांग फडके, युवक जिल्हासरचिटणीस समाधान चोथे, रंगनाथ महाले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते .