Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अ.भा.वि.प. संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.



तालुका प्रतिनिधी शंकर निंबारे

  दि. २४ रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी ते खरोली या पुलाचे काम दहा वर्षे झाले असून अद्यापही काम अपुर्ण असल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष बिरसा मुकने यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सह मुख्य अभियंता सा.बा. प्रादेशिक विभाग नाशिक, कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग (उत्तर) नाशिक यांना निवेदन देण्यात आले आहे.

   निवेदनात २०१४ साली वर्क ऑर्डर मिळाली आहे. २०१८ पर्यंत काम चालू नव्हतं २०२४ पर्यंत अजूनही अद्याप काम बाकी आहे. बी.बी.एम. पोट हॉल सिल कॉट अजून बाकी आहे. मुख्य अभियंता सा. बा. नाशिक, कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग नाशिक, जिल्हा कार्यालय नाशिक यांनी सदर ठेकेदारास प्रतिदिन दंड लावलेला नाही. तरी रिक्स अँड कॉस्ट इतर कामातून कार्यकारी अभियंता वसूल करू शकता व कळ्या यादीत टाकू शकतात तरी सदर कामाची सखोल चौकशी होऊन कामास का विलंब झाला. विलंब करण्यास  यापैकी कोण जबाबदार आहे. आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदाराला अथवा शासकीय अधिकारी यांच्यावर अनुसूचित  जाती जमाती ॲक्ट नुसारअंतर्गत गुन्हा नोंदवावा.  गुन्हा नोंदवून  कारवाई करावी. सदर काम हे गावाच्या माहितीनुसार अद्याप कार्पेट व सिल्कोट केलेले नाही. सदर कामास दहा वर्ष विलंब झालेला आहे. असे निवेदनात म्हटले आहे. तसेच कारवाई नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने देण्यात आला आहे.