बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान व आधुनिकता आल्याने मोठे बदल होताना आपण पाहत आहोत . गतिमानता वाढली आहे म्हणून आपण संस्कार व नितीमत्ता सोडू नयेत . शिक्षणाचा परिणाम गुणपत्रीकेतून नव्हे तर वर्तणूकीतून दिसायला हवा असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव यांनी श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे आयोजित विदयार्थी मार्गदर्शन शिबीरात केले .
प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य श्री रविंद्र येवले यांनी "आनंदी गणित " या विषयावर विदयार्थ्याना मार्गदर्शन करताना व्यवहार व गणित यांचे महत्व सांगीतले . गणित विषय आनंदाने शिकता येतो त्या विषयीचे अनेक किस्से सांगून विद्यार्थी व शिक्षकांची मने जिंकली .
गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी माजी प्राचार्य श्री के .डी. पवार यांनी प्रास्ताविक केले .यावेळी मराठी विषयाच्या व्याकरण हस्तपुस्तिकेचे व इयत्ता १० वी प्रश्नसंचाचे प्रकाशन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले .कार्यक्रमास संस्था विश्वस्त श्री एस .आर. पाटील सर, सदस्य श्री जयंतराव जाधव, प्राचार्य श्री डी .एन. गोफणे, पर्यवेक्षक श्री आर .एन. जाधव, श्री अशोक वळवी, श्री संजय वायदंडे, सौ शोभाराणी लाड, श्री जगदीश कुचेकर, सौ पाटील, सौ हेमलता देशमुख, सौ स्नेहल जाधव, पालक , शिक्षक , विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते .श्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले .सौ माधुरी चव्हाण यांनी आभार मानले .





Social Plugin