Ticker

6/recent/ticker-posts

आरंभ अंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन.


तालुका प्रतिनिधी शंकर निंबारे

 धारवड खु. |  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या सामुंडी/ टाकेदेवगाव विभागातील धारवड खुर्द येथे (दि.१९) रोजी आरंभ अंतर्गत पालक मेळाव्याचे पर्यवेक्षिका श्वेता उज्ज्वला प्रकाश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. मेळाव्याचे  उद्घाटन गावचे सरपंच सो. यांच्या हस्ते करण्यात आले.

   मेळ्याव्यात अंगणवाडी ताईनी भविष्याचे झाड, संवेदनशील पालकत्व, घरी बनविलेली खेळणी, घरगुती वाद्य, आहार प्रदर्शन, झुंबर, बाहुलीघर, जादूचा बोगदा, पाण्याचे खेळ, आपले आरोग्य, मेंदूचे जाळे असे विविध स्टॉल लावण्यात आले असून स्टॉलचा मनसोक्त आनंद उपस्थितांनी घेतला. पुन्हा एकदा लहानपण अनुभवल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या..तीन वर्षापर्यत बालकाच्या मेंदूचा ८०-८५% विकास होतो, म्हणूनच संवेदनशील पालकत्वाच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास कसा साधावा याची परिपूर्ण माहिती अंगणवाडी ताइनी स्टॉलच्या माध्यमातून पालकांना दिली. 

   आदिवासी एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग तसेच ग्रामपंचायत विभागाच्या संयुक्त विद्यमानाने पालक मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगझाप सर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास सरपंच जाधव सो., उपसरपंच, मानसेवी अधिकारी डॉ. सातपुते मॅडम, पर्यवेक्षिका सोनवणे मॅडम, खोटरे मॅडम, क्षीरसागर मॅडम, मुख्याध्यापक श्री. आहिरे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एएनएम, आरोग्य सेवक अंगणवाडीताई, आशा, ICRP, बचतगट अध्यक्ष, गरोदरमाता, स्तनदामाता, बालके तसेच पालक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.