प्रतिनिधी- किसन भुतांबरे-ओतूर
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ पाच किलोमीटर अंतरावर फाळूकदरा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा दिनांक 10 -10 -1983 साली सुरू झाली आहे. डिंगोरे गावाशेजारील पुष्पावती नदी ओलांडून अनेक वर्षे पायवाटेने जाऊन शिक्षकांनी या आदिवासी ठाकरवाडीतील मुलांना शिक्षणाची दारे उघडी केलेली आहेत. स्थानिक आदिवासी लोकांनी मोफत शाळेला जागा दिली आहे. त्यावर इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग चालू आहेत. सन 1983 सालापासून डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शाळेला संरक्षण भिंतीसाठी अनेक वेळा ग्रामपंचायत डिंगोरे स्तरावरुन ,पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे अर्ज करूनही आजपर्यंत या आदिवासी ठाकरवाडीतील शाळेला संरक्षण भिंत मिळालेली नाहीच. संरक्षण भिंतीसाठी अनेक वेळेला अर्ज करूनही शाळेला संरक्षण भिंत मिळालेली नाही म्हणून या ठिकाणी आदिवासींनी एकत्र येऊन शाळेला 45 मीटर लांब व 26 मीटर रुंदीची शाळेच्या भोवती तारेची संरक्षण कुंपण घालून आपणच आपल्या मुलांचे संरक्षण केले पाहिजे. म्हणून कुंपण घालण्यासाठी एकत्र येऊन यासाठी सर्व आदिवासी समाजातील लोकांनी मोल मजुरी करून त्यामधून पैसे जमा करून त्या ठिकाणी आपल्या मुलांचा संरक्षणासाठी हे तारेचे कुंपण घातलेले होते.आज संरक्षण तारेचे कुंपण मोडकळीस आलेल आहे. आज संरक्षण तारेचे कुंपण राहिलेच नाही
शाळेला कायमस्वरूपी संरक्षण भिंतीची गरज आहे .ती मिळविण्यासाठी या शाळेची प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीने यावर्षी दि.27-06-2024ला शाळेला 45मीटर लांब आणि 26मीटर रुंदीची संरक्षण भिंत बांधून मिळावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावरुन पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) यांना अर्ज पाठविलेला आहे आदिवासींसाठी शासनाचे भरपूर सुविधा असूनही आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी संरक्षण भिंत मिळत नाही असे दिसून येते. या अर्जाने तरी संरक्षण भिंत बांधून मिळावी असे स्थानिक पालकांना आशा वाटते. शासनाच्या सुविधा कागदोपत्रीच आहेत की काय असे काही स्थानिकांना वाटू लागले . आदिवासी लोकांना दररोज मोलमजुरी करून आपली कुटुंब चालवावे लागतात .त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणी याविषयी चौकशी करण्यासाठी पुढे येत नाही .
आज महाराष्ट्रात मुला मुलींचे बाबतीत अनेक घटना घडतात .त्या दृष्टीने शाळेभोवती संरक्षण भिंत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे . ही आदिवासी वस्ती डोंगरा जवळ असल्याने बिबट्याची दहशत निर्माण झालेली आहे .हा परिसर *बिबट प्रवण* क्षेत्रात असल्याने भीतीचे वातावरण नेहमीच असते . महाराष्ट्रात बदलापूर सारख्या अनेक घटना घडत आहे. त्यासाठी त्या घडू नये यासाठी आदिवासी मुलींची समस्या दूर व्हावी. यासाठी शाळेला शासनाने लवकरात लवकर संरक्षण भिंत बांधून द्यावी .असे जिल्हा प्राथमिक शाळा फाळूकदरा येथील शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष -श्री अनिल बबन तळपे यांनी सांगितले .यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता भुतांबरे .उपशिक्षक श्री प्रदीप नलावडे. व स्थानिक पालक सूर्यकांत मना जाधव.सौ. कमल सुनील तळपे .काशिनाथ सखाराम भले. गणपत भले.सौ.राधा जाधव. श्री दत्तात्रय रामचंद्र जाधव .सौ.ललित कैलास भले .सौ.कमल तळपे.सौ.अर्चना भले.सौ.गीता भले.सौ.शीतल भले.सौ.काजल भले.सौ.सुवर्णा तळपे श्री संपत भले.असे अनेक पालक उपस्थित होते
अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनिल बबन तळपे यांनी दिली.





Social Plugin