Ticker

6/recent/ticker-posts

कारागृहात मोफत चष्मे वाटप शिबीराचे आयोजन



बुध  दि .[प्रकाश राजेघटगे ]  

सातारा कारागृह येथील बंदयांना समता फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या डोळे तपासणी शिबीरानंतर मोफत चष्मे वाटप करण्यात आले.कारागृह प्रशासनाचे ब्रीद वाक्य "सुधारणा पुनर्वसन" आहे. कारागृहात येणारा प्रत्येक आरोपी हा काही अट्टल गुन्हेगार नसतो, तर त्यामध्ये काही निष्पाप देखील असतात. त्यामुळे कारागृह प्रशासन, अधिकारी व कर्मचारी अट्टल गुन्हेगाराला वेगळी वागणूक आणि साध्या गुन्हेगाराला किंवा जे निष्पाप आहेत त्यांना वेगळी वागणूक देत नाहीत, तर सर्वांना समान वागणूक, सेवा सुविधा देण्याचे काम करतात. सुधारणा पुनर्वसनाचे विविध पैलू बंद्यांच्या हितासाठी वापरले जावेत याबाबत मार्गदर्शन कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेहमीच देण्याचे अनमोल काम कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक श्री प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर व कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडून मिळत असते.

समता फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम अग्रवाल हे नेहमीच कारागृहातील सर्व बंद्यांच्या हिताच्या सर्व बाबी करीत असतात. त्यांचे टीम लीडर श्री दिपक लोया, प्रियांका मुंडे, सत्यनारायण इंगळे, आदित्य उखळकर आणि इतर सर्व जण सातारा कारागृहात बंद्यांच्या सुधारणा पुनर्वसनात मोलाची मदत करतात.नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप याचा मुख्य उद्देश जरी बंद्यांना स्वच्छ व चांगले दिसावे हा असला, तरी त्यांचा गुन्हेगारी दृष्टिकोन जावून प्रत्येक बंद्यांमध्ये एक चांगला सामाजिक व कौटुंबिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, जन्म घ्यावा हाच असतो, असे मत कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी व्यक्त केले.