Ticker

6/recent/ticker-posts

जांब येथे फुलले ब्रम्हकमळ


प्रतिनिधी-संजय भरदुक मंपीर 

मंगरूळपिर--तालुक्यातील जांब येथील श्री गणेश कोंडूराम ठाकरे यांच्या घरी रात्री ब्रम्हकमळ फुल उमलले असून त्याला पाहण्यासाठी गावातील बरीच लोक येत आहे हे फुल वर्षाकाठी एकदाच उमलते त्यामुळे बहुतेक लोकांना यांचा आनंद झाला बर्याच लोकांनी आता पर्यंत पाहिले सुध्दा नाही त्यांच्या साठी बघण्याची चांगली संधी आहे तरी एकदा ब्रम्हकमळाचे फुल बघावे .

ब्रम्हकमळ चे पौराणिक ऐतिहासिक महत्त्व आहे.ब्रम्हदेवाने स्वतः हा. निर्माण केलेले फूल असून विष्णू देवाला आवडते फुल आहे.तसेच यांचा उपयोग शिवाची पूजा आराधना करण्यासाठी सुध्दा केला जातो.ब्रम्हकमळ फुलतांना पाहणे हा खूप भाग्याचा क्षण असतो.ब्रम्हकमळ हिंदू आध्यात्मिक चे प्रतीक आहे हे फुल सहसा वर्षातून एकदाच उमलते सहसा उत्तराखंड मध्ये जास्त प्रसिद्ध फुल आहे त्या भागात जास्त प्रमाणात आहे . तरी गणेश ठाकरे यांनी हे फुल आपल्या घरी देवघरात पुजन करून अर्पण केले आहे