बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पौष्टीक तृण धान्य प्रोत्साहन अभियान, अंतर्गत शेतकरी यांच्या ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, वरी, या तृण धान्यचे आरोग्य महत्व व विविध प्रक्रिया उत्पादन करून गावातील महिलांना उपजीविका निर्मिती करणे बद्दल सदर महिला मेळावा आयोजन करण्यात आला होता .
या वेळी ग्रामपरिवर्तन संस्थाचे श्री प्रताप गोरे, कृषी सखी सौ, पूजा फडतरे, उमेदच्या पूजा फडतरे, उषा शिलाई सखी, सौ, प्रणाली फडतरे, यांनी सदर महिलांना आरोग्य व मिलेट्स चे महत्व याबद्दल सविस्तर माहिती देऊन माहिती पुस्तिका देऊन मार्गदर्शन केले. या मेळाव्यात माणदेशी फौंडेशनच्या सौ जया काळे, सौ संजीवनी डोईफोडे या विशेष ट्रेनर नि ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा, व इतर तृण धान्य पासून नाचणी केक, राजगिरा वडी, व लाडू, नाचणी चे बिस्कीटस, ज्वारी, बाजरी. लाह्या, ज्वारी, बाजरी चे पापड, तसेच नूडल्स बनवणे, कच्चे ज्वारी चे पोहे बनवणे इ, पदार्थ बनवणे बाबतीत सुमारे पन्नास पेक्षा अधिक उमेद च्या गटातील महिलांना प्रत्यक्ष कृती सह ट्रेनिंग देऊन ऊर्जा निर्माण करून दिली, व पुढील दिशा व छोटी मिलेट्स इन्स्टॉल करणे बाबतीत कृती कार्यक्रम दिला. या वेळी गावच्या सरपंच सौ ताराबाई राऊत, सामाझिक कार्यकर्त्यां सौ सारिका धनंजय क्षीरसागर, इतर सामाझीक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.





Social Plugin