कोदामेडी येथील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न घडला
( प्रतिनिधी - शैलेश कावळे )
लाखांदुर:-
राजकीय दबावाखाली दिघोरीचे ठाणेदार यांनी कोदामेडी येथील चार वर्षीय बलिकेवर झालेल्या अतिप्रसंगाच्या संबंधाने आरोपींना मदत केल्याप्रकरणी सदर ठाणेदारांना निलंबित करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.या मागणीला घेऊन नाथजोगी समाज बांधव सहपरिवार पंचायत समिती ते तहसील कार्यालय पर्यंत पायी मोर्चा ता.17 सप्टेंबर ला दुपारी काढण्यात आला.यावेळी आंदोलन कर्त्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
सविस्तर असे की तालुक्यातील कोदामेढी हे गाव नाथ जोगी समाजाचे आहे या गावामध्ये तारीख 17 जुलै रोजी गावातीलच एका पान टपरीवर काही साहित्य घेण्यासाठी एक विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुली सोबत गेली होती. याच दरम्यान घटनेतील आरोपी भक्तराज आप्पा जगताप व इतर 14 यांनी तिच्या नवऱ्याने त्याच्या मुलीचा फोटो मोबाईल वर वायरल केल्या प्रकरणी भांडण झाला .त्यावेळी राकेश जगताप याने पिढीतेच्या आईला पकडले व तिच्या कडेवरून पीडित चार वर्षीय बालिकेला हिष्कावले व तुझ्या नवऱ्याला दोन तासात बोलावं नाही तर रस्त्यावर तुझ्यावर व तुझ्या मुलीवर बलात्कार करू अशी धमकी दिली व रस्त्यावर पीडितेला घेऊन गेला व कपडे काढण्याचं प्रयत्न करीत असतांना पिढीतेची आई धाऊन मुलीला हिसकावले .राजेंद्र तंबूलकार, नरेश तांबुलकर यांनी पीडितेच्या आईवर अतिप्रसंग करण्याचं प्रयत्न केला.तर यातील आरोपी यांनी पिडीत च्या आईला तिच्या घरी नेले व तिच्या सासऱ्याला इलेक्ट्रिक च्या खांबाला बांधले.काही वेळाने कुणी तरी 112 वर फोन केल्याने दिघोरी ची पोलीस गाडी आली त्यात एक महिला पोलीस हिने हा प्रकरण थांबविण्याचा प्रयत्न केला असता तिलाही आरोपी यांनी धक्का बुक्की केली.त्या नंतर दिघोरी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणात ठाणेदार यांनी थातुरमातुर चौकशी करून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.या प्रकरणात न्याय न मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली त्यावरून दिघोरी पोलिसात सदर 11 आरोपीविरुद्ध अतिप्रसंग केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या प्रकरणात ठाणेदार यांनी योग्य चौकशी न केल्याने या घटनेतील आरोपी यांना न्यायालयातून तात्काळ जामीन मिळाली जामिनावर असलेल्या आरोपी यांनी पीडीतेच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊन धमकावण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत यासंदर्भात दिघोरी पोलिसात याची माहिती दिली असता कुठलीही कारवाई केली जात नाही त्यामुळे पीडीतीच्या कुटुंबीयांना धोका असून समाजात जगणे कठीण झाले आहे या प्रकरणात राजकीय दबावापोटी थातुर्मातुर कारवाई केली जात आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी आरोपीवर कठोर कारवाई करून ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे या मागणीला घेऊन तारीख 17 सप्टेंबर रोजी दुपारी पंचायत समिती लाखांदूर येथून नातजोगी समाज बांधवांनी आपल्या परिवार सह पायी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला तहसील कार्यालयामध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले या मोर्चात नाथ जोगी समाजाचे कार्तिक वडस्कर यांनी नेतृत्व केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा महिला सचिव डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर सोनीच्या सरपंच कुणता शहारे, दिलीप चित्रवेकर, कार्तिक वडस्कर यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री व महिला आयोग यांना निवेदन पाठवून आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनादरम्यान ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर आरोग्य विभाग यांनी लहान मुलांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आरोग्यसेवा मोर्चादरम्यान करण्यात आली होती .





Social Plugin