प्रतिनिधी--संजय भरदुक
मंगरूपीर---दिंनांक ०६/०९/२०२४रोजी ग्राम गाववळ येथील प्रयोगशील शेतीनिष्ठ महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या सेंद्रिय शेतीतील अपलातू प्रयोग रोज पैसे देणारी नैसर्गिक शेती संकल्पना पाहण्यासाठी जिल्हा परिषद वाशिम येथील सुनील निकम साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्यासह पंचायत समिती कृषी अधिकारी पंचायत समिती कारंजा अनिल राठोड साहेब व लक्ष्मण कोल्हे साहेब विस्तार कृषी अधिकारी पंचायत समिती कारंजा तसेच ग्राम गायवळ येथील कार्यकारी सरपंच सतीश पाटील राऊत सह अधिकाऱ्यांनी यांनी शेतीनिष्ठ रवींद्र गायकवाड यांच्या शेतातील एकात्मिक शेती उपक्रम, नैसर्गिक शेती व्यवस्थापन, देशी गोपालन, देशी कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व संगोपन केंद्र, बायोडायनॅमिक कंपोस्ट निर्मिती, एस नाईन कल्चर निर्मिती, नाडेप कंपोस्ट, विहीर पुनर्भरण, शेत बांधावरील बायो इनपुट प्रयोगशाळांमध्ये ट्रायकोडर्मा रायझोबियम मायक्रोरायझा सुडोमोनास निर्मिती, फळ रोपवाटिका, तसेच इंडो इजराइल पद्धतीने लागवड केलेली संत्रा फळबाग व मिश्र फळपीक पद्धती, बेडवरील टोकन पद्धतीने लावलेले सोयाबीन विविध प्रकारचे बांधावरील फळझाडे लागवड, संपूर्ण पारंपारिक ऊर्जा स्त्रोत चा वापर, आधी घटकाची पाहणी करण्यात आली व बायोगॅस लाईव्ह डेमो दाखवण्यात आला
शेतकऱ्याकडे रोज पैसे यावे याकरिता रवींद्र गायकवाड यांनी अल्प खर्चामध्ये देशी जुगाड करून आपल्या शेतामध्ये एकात्मिक शेती उपक्रमांअतर्गत विविध घटक राबविले असून या घटकाच्या अंतर्गत रवींद्र गायकवाड यांचे शेतामध्ये रोज पैसे येतात. रोज पैसे देणारी शेती ही संकल्पना यशस्वी प्रयोग केल्याबद्दल सदर संकल्पनेची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम साहेब यांनी प्रशंसा केली तसेच सुनील निकम साहेब यांनी फळबाग लावगड व व्यवस्थापन रोपवाटिका व्यवस्थापन आदी विषयावरती उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संत गाडगेबाबा सेंद्रिय शेती बचत गटाचे शेतकरी किरण घनश्याम निचडे ,बाळू इंगळे विष्णु शिंदे, सह वाशिम ऑरगॅनिक मिशन महासंघ फॉर्मर प्रोडूसर कंपनी चे डायरेक्टर्स व चेअरमन उपस्थित होते





Social Plugin