Ticker

6/recent/ticker-posts

विसापूर येथे रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा शुभारंभ

 


                        महायुतीचाच झेंडा राज्यभर फडकेल ना. महेश शिंदे यांचा विश्वास, 

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

स्व. लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेतील पुढचा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे या भागातील शिवारात पाणी येणार आहे. तसेच काही काळात मोठा निधी मिळणार आहे. त्यामुळे या भागाचा कायापालट होईल. सकारात्मक, विकासात्मक राजकारण करत असल्याने स्वप्न पूर्ण होत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजना यशस्वी होत असल्याने महायुतीच्या झेंडा महाराष्ट्रभर फडकणार असल्याचा विश्वास कृष्णा खोरे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी व्यक्त केला

विसापूर (ता. खटाव) येथे विसापूर ते बुधावलेवाडी आणि विसापूर ते रेवलकरवा डी-बुधावलेवाडी या ११ कोटी २४ लाख रुपयर्याच्या रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन ना. महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, राहुल पाटील, सरपंच अभयराजे घाटगे, सरपंच निलिमा जगताप, सरपंच अमित मदने, हरिश्चंद्र सावंत, हरिदास जगदाळे, बाळासाहेब सावंत, मुरलीधर साळुंखे, ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. महेश शिंदे म्हणाले, सिंचन योजनेचे दुसऱ्या टप्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच या विभागाच्या शिवारात पाणी येणार आहे. तर एक महिन्यात २१०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व प्रलंबित विकासकामे निश्चितपणे पूर्ण होतील. सकारात्मक राजकारण केल्याने विकास साधण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जनतेला देण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. विरोधक दिशाभूल करतात. त्यामुळे गाफील राहू नका. मला पद नको, पाणी पाहिजे ही माझी भूमिका आहे. शासनाच्या लाडकी बहिण यासह विविध योजना यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे महायुतीचा झेंडा महाराष्ट्रभर फडकेल असा विश्वास ना. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी शंकर कदम, दिपक सावंत, सुरेश बुधावले, आबा मदने, राहुल शिंदे, संजय सावंत, नवनाथ साळुंखे, सचिन गुजर, संदीप जगताप, भानुदास फडतरे, हरी लोंढे, सोमनाथ मदने, ग्रामस्थ उपस्थित होते.


शूत्रसंचालन बाबूराव सावंत यांनी केले. तर प्रथमेश सावंत यांनी आभार मानले.