Ticker

6/recent/ticker-posts

राजस्थान मित्र मंडळाच्या गणपतीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन



संपूर्ण मलकापूर तालुक्यामध्ये लाडक्या बाप्पाला ढोल ताशाच्या गजरामध्ये अखेरचा निरोप मलकापूर तालुक्यात शांततेत त गणपती विसर्जन


प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर


मलकापूर :-  संपूर्ण देशामध्ये तसेच राज्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या गणेश मूर्तींचा मोह, डीजेच्या आवाजाने संपूर्ण परिसर दूषित होत चाललेला आहे. वेगवेगळ्या लेझर लाईट मुळे डोळ्यांना सुद्धा इजा पोहोचत आहे त्यातच भला मोठा खर्च आणि लोकांकडून वर्गणीच्या स्वरूपात मोठमोठी देणगी जमा करण्यात येत आहे, परंतु या सर्वांवर मात करत कुठलाही गाजावाजा नाही कुठलाही डीजे नाही अगदी पारंपारिक पद्धतीने मलकापूर मधील राजस्थान मित्र मंडळाच्या गेल्या 70 वर्षाचा आदर्श घेत यंदा सुद्धा साध्या पद्धतीने पालखीमध्ये गणरायाचे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संपूर्ण ग्राम प्रदर्शना पूर्ण करून लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप देण्यात आला.

तसेच शहरांमध्ये शांततेत मिरवणूक पार पडावी यासाठी शहरांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला होता ठिकठिकाणी गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांच्या नाश्त्याची व्यवस्था भाविकांकडून करण्यात आलेली होती शहरांमधील मुख्य रस्त्यातून जवळपास 28 गणेश मंडळांच्या मिरवणुका पार पडल्या.