Ticker

6/recent/ticker-posts

शेअर मार्केटच्या नावाखाली पावणे तीन कोटी रुपयांचा गंडा घालणारा आरोपी गजाआड ,


शेवगाव पोलीसांनी सापळा लावुन छत्रपती परमेश्वर विघ्ने यास केले जेरबंद ,

शेवगाव  - नंदकिशोर चव्हाण

शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली ट्रेडिंग कंपनी उघडून कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्याचा गोरख धंदा सध्या सुरू झाल्याने ठेवीदारांना महिन्याला जास्त दराने व्याज  देण्याचे अमिष दाखवल्याने ठेवीदारांनी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केल्यामुळे आणि त्यांना त्याचा परतावा न मिळाल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करीत असल्याने पोलिसांनी शेअर मार्केटच्या ट्रेडिंग चालकांना धरपकड सुरू केली असून शेवगाव पोलीस स्टेशनला नवीन खानपिंपरी येथील बबन अण्णासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून  CDG  इन्व्हेस्टमेंट नावाचे शेअर मार्केट अंतरवाली खुर्द येथील छत्रपती परमेश्वर विघ्ने यांनी सुरू केल्याने कंपनीच्या नावाखाली पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक झाली 

असल्याची फिर्याद दिल्याने शेवगाव पोलिसात गु.र.नं- 685/2024 भादवि कलम -420,409,406,34 प्रमाणे दिनांक-12/08/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता , सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक  राकेश ओला सो अहमदनगर, मा.अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहमदनगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी  सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोसई भास्कर गावंडे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकॉ प्रशांत आंधळे, पोकॉ संपत खेडकर, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ बप्पासाहेब धाकतोडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.