Ticker

6/recent/ticker-posts

नवेगाव बु. येथे विजेचा थरकाप...



मोहाडी तालुक्यातील मौजा नवेगाव बु.येथे रात्री ठीक वाजून 9.10 मिनिटांनी गावातील इलेक्ट्रिक पोलवर विजेच्या धक्क्याने गावातील अनेक लोकांच्या टीव्ही ,फ्रीज, पंखे, संगणक , लाईट व घरातील इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . गावातील इलेक्ट्रिक पोलच्या तारा सुद्धा तुटल्या. आणि अनेकांचे मीटर बंद झाले. रात्रीपासून गावातील लाईट सुद्धा बंद पडली .पोळ्या सारखा असताना अंधारात साजरा करावा लागत आहे.परंतु सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.