Ticker

6/recent/ticker-posts

दोन कब्रस्तानातील अतिक्रमण उठवले एक मिनार मस्जिदचे अतिक्रमण का नाही उठवली - खिजर शेख .



ग्रामीण प्रतिनिधी  मारोती गाडगे/कटचिंचोले 


गेवराई(बीड ):-

ता.१६ दोन कब्रस्तानातील अतिक्रमण उठवले एक मिनार मस्जिदचे अतिक्रमण का नाही उठवली - खिजर शेख . गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही युवकांनी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी तलवाडा या ठिकाणी मुस्लिम समाजातील कब्रस्तान च्या कडेला छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले होते मुस्लिम समाजातीलच बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी विधानसभेसाठी शक्कल लढून अख्खा मुस्लिम समाज आमच्या पाठीमागे आहे असे दाखवून अशा पोट भरणाऱ्या लोकांच्या विरोधात जाऊन मुस्लिम समाजाला भडकवून लोकशाही मार्गाने आंदोलन करीत अशा लोकांना उठवण्याचे काम काहींनी केले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत तरीपण दोन कब्रस्तानातील अतिक्रमण उठवले असताना एकमिनारचे कब्रस्तानचे अतिक्रमण का नाही उठवले असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख खिजर भाई यांनी प्रसिद्धी पत्रकार केला आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी जुने बस स्टँड शेजारी निजाम कालीन तलवाडा गावात मुस्लिम समाजाचे कब्रस्तान पाच असून तीन-तीन कब्रस्तान वर काही लोकांच्या म्हणण्यानुसार दहा वर्षापासून ह्याच लोकांच्या म्हणण्यानुसार जे मुस्लिम समाजातील युवकांना धंद्यासाठी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी दुकानाचे पॉईंट देण्यात आले होते तसेच त्यांच्याकडून महिनाही ठरवून घेण्यात आला होता तसे ते युवकांचेही चांगले धंदे चालत होते आपला संसाराचा पोटा पाण्याचा प्रश्न भागला असे त्यांना वाटत होते तसे धंदेही त्या ठिकाणी चांगले चालत होते मात्र ज्या लोकांनी धंदे टाकण्यासाठी जागा दिली होती त्याच लोकांनी विधानसभा तोंडावर आली असता मुस्लिम समाज आमच्या पाठीमागे आहे असे दाखवून मुस्लिम समाजाची दिशाभूल करून या लोकांनी त्यांना गेवराई येथे नेले व लोकांची डोके भडकून दिनांक 9 रोजी तहसील या ठिकाणी उपोषणास बसवले शासनाला वेठीस धरून त्यांच्याकडून सात दिवसाची मुदत घेऊन दुकाने काढण्यात येते असे आश्वासन घेऊन इकडे गरीब लोकांनी ते दुकाने काढण्यात आली आज त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून आज त्यांची संसार उघड्यावर पडले आहेत मात्र ज्या लोकांनी हे काम केले आहे विधानसभा तोंडावर आली असताना कोणाकडून काही चिरीमिरी भेटते की काय त्यामुळे असे काम केले आहे एवढा अतिक्रमणाचा पुळका असताना एक मिनार मस्जितीपाशी बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी अतिक्रमण करून पक्के घरे बांधून घेतले असून त्या ठिकाणी या लोकांना अतिक्रमण दिसत नाही का? गरिबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय असाच प्रकार दिसून येत असून गेवराई तलवाडा रोडवर असलेल्या एक मिनार मस्जितीपाशी पक्के घर बांधलेले तोडण्यात येतील का? त्या ठिकाणी ज्यांनी गोरगरिबाच्या दुकानावर हातोडा मारला या घरावर मारतील का? एक मिनार पाशी झालेल्या अतिक्रमावर जे पोपटासारखे बोलत होते ते आता उपोषणाला बसतील का? असा संतप्त सवाल स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख खिजर भाई यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे उपस्थित केला आहे..