प्रतिनिधी -संजय भरदुक मंपीर
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान रात्री 12 वाजेपर्यंत शोध घेणार आहेत
जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम तसेच निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे सर यांच्या आदेशाने सर्चऑपरेशन चालु
*घटनाक्रम*. दुपारी वाशिम जिल्ह्य़ातील मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रहीवाशी सागर अरुण प्रधान वय अं.30 (वर्ष) हा युवक गावातुनच वाहणा-या अडाण नदिला आलेल्या पुरात वाहून गेल्याची माहीती मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले
लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी विष्णु केवट,शेखर केवट,अश्विन केवट,महेश वानखडे,अतुल उमाळे, गोपाल गीरे,अपूर्व चेके, शुभम भोपळे,दत्ता मानेकर, राम भोपळे, सागर डाके, रोषन झामरे यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले आणी अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन चालु केले यावेळी घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव सर,तहसीलदार शितल बंडगर मॅडम,ना.त.रवी राठोड सर,जि.आ.व्य.अ. शाहु भगत साहेब,तलाठी टी.एन.गावंडे,तलाठी दिनेश राऊत,तलाठी एन पी पांडे,हे हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.





Social Plugin