Ticker

6/recent/ticker-posts

बैल आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये नेले असता दोन तरुण शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू


पोळ्यानिमित्त बैलांना धुण्यासाठी नदीवर नेले असता मलकापूर तालुक्यातील दोन गावांमध्ये घटना

प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर

मलकापुर:- पोळ्याच्या दिवशी बैल सजवले जातात तत्पूर्वी त्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे वय ३२ वर्ष तर हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर वय २७ वर्ष  यांचा कावळा लागूनच असलेल्या नदीमध्ये बुडून दुर्दैव मृत्यू झाला.

ही घटना कळताच  क्षणांनाही विलंब न करता तातडीने  रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी तालुक्याचे आमदार व तहसीलदार साहेब घटनास्थळी पोहोचून संबंधित बाबीचे सविस्तर माहिती घेतली.दोन्ही शेतकऱ्यांच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून या दुर्दैवी घटनेबद्दल  संपूर्ण गावावर शोक सणाच्या दिवशी शोककळा पसरलीं . प्रशासकीय अधिकारी व आमदार राजेश एकडे  मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन करीत धीर दिला.