ग्रामीण प्रतिनिधी मारोती गाडगे/कटचिंचोली
गेवराई (बीड):-ता ३०/सोमवार लाईट विना कटचिंचोली येथील पाणी प्रश्न कायमचा मिटला.गेले आनेक वर्षे कटचिंचोली येथील लाईट पुर्ण नसायची परंतु आज मात्र कटचिंचोली येथील ग्रामपंचायत सरपंच ,निवारे यांनी ग्रामपंचायत वाटर सप्लाय ला सोलर जोडून कटचिंचोली गावचा लाईट विना पाण्याचा प्रश्न सोडला लाईट आसो किंवा नसो कटचिंचोली गावाला पाणी मात्र बार महिने पाणी मिळणार.
सोलार पंपाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कित्येक वर्षांपासून गावातील पाणी प्रश्न कायमचा मिटावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. आज गोदावरी नदीवर सोलार पंप बसवून त्याची यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली.ग्रामस्थांना पाण्याची अडचण आता कधी होणार नाही. कटचिंचोली येथील पाण्याचा सोडल्या मुळे गावकऱ्यांने ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंच यांचे आभार मानले.





Social Plugin