Ticker

6/recent/ticker-posts

सीसीटीव्ही कॅमेरे व वायफाय कनेक्शन



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी या शाळेचे माजी विद्यार्थी अजित रणसिंग यांनी विद्यार्थी व शाळेच्या  सुरक्षिततेची गरज ओळखून  रणसिंगवाडी हायस्कूलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वाय फाय कनेक्शन देण्यात आले आहे .दानशूर व्यक्तिमत्वाचे अजित रणसिंग हे नेहमीच सामाजिक जबाबदारी चे भान ठेवून शाळेसाठी मदत करत असतात. त्याबद्दल  सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिन व सर्व सन्माननीय सदस्य, श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माया पाटील मँडम, शिक्षिका सौ जाधव मँडम, सौ फडतरे मँडम श्री गिरीगोसावी सर व शिक्षकेतर कर्मचारी अभंग मामा, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ व ग्रामस्थ यांचेमार्फत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन  करण्यात येत आहे