Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला नाशिक दौऱ्यावर,



नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून बैठकांचा सपाटा लावला आहे. त्याच अनुषंगाने भाजपने  देखील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या कमी जागांवरून खबरदारी घेत विधानसभेसाठी सावध पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  हे २५ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक बैठक घेणार असून उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बाहेरील राज्यातून आलेले प्रभारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ८ पैकी केवळ २ जागांवर महायुतीला जिंकता आल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजप या बैठकीत रणनीती आखणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे करत असून ते आज नाशिकमध्ये आहेत.