बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेसावळी येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 7वी वर्गातील कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवला असून14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक ए .बी. सावंत , पर्यवेक्षक एस .डी. सावंत , स्थानिक स्कूल समिती, शाळा व्यवस्थापन समिती, गुरुकुल विभाग, माता पालक संघ शिक्षक पालक संघ व शाळेतील सर्व शिक्षक व सेवक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शाळेत नेहमीच विविध उपक्रम घेतले जातात. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभाग असतो.





Social Plugin