नाशिक,प्रतिनिधी ,अमन शेख..
यंदाच्या गणपती महोत्सवात अधिक पावसाची शक्यता आहे. ६ ते १२ सप्टेंबरच्याआठवड्यात विदर्भ, कोकण-गोवा तसेच उत्तर महाराष्ट्रातपाऊस राहील. या कालावधीत दक्षिणेकडील राज्यातपावसाची ओढ राहील. मध्य भारत, उत्तरेकडील राज्यात याकाळात पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे.यंदा गणेशोत्सवात दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यातआली आहे. त्यामुळे उत्साहावर पावसाचे विरजण तरपडणार नाही ना, अशी धाकधूक भक्तांच्या मनात निर्माणझाली आहे.
सप्टेंबरच्या प्रत्येक आठवड्यात प. बंगालच्याउपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यताआहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस पडूशकतो, असा अंदाज मोहपात्रा यांनी व्यक्त केला.ऑगस्टमध्ये वायव्य भारतात २५३.९ मिमी पाऊसनोंदवला गेला. २००१ नंतर पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातइतका पाऊस पडला आहे, असे हवामान खात्याने सांगितले.संपूर्ण देशात ऑगस्टमध्ये २८७.१ मिमी पाऊस पडला. यापूर्वी ऑगस्टमधील पावसाची सरासरी २४८.१ मिमी होती.१ जूनपासून आतापर्यंत देशात ७४९ मिमी पाऊस पडला आहे .
.jpeg)




Social Plugin