Ticker

6/recent/ticker-posts

डहाणू ते नाशिक रेल्वे चा मार्ग मोकळा होणार..



नाशिक, प्रतिनिधी अमन शेख, 

■अंतिम सर्वेक्षणासाठी अडीच कोटी मंजूर पर्यायी मार्गांचाही विचार केला जाणार

१०० किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्गनाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठीजमिनीच्या सर्वेक्षणासाठी एकूण रु. अडीच कोटी रुपयांच्याखर्चास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणिवाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू या दोन प्रमुख शहरांनाजोडणारा १०० किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचीयोजना मध्य रेल्वेने आखली आहे. हा मार्ग झाल्यानंतर धार्मिकपर्यटनाबरोबरच ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे.

सागरी, नागरी, डोंगरी आणिप्रामुख्याने ग्रामीण विकासालानवसंजीवनी देणाऱ्या डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाच्या अंतिमसर्वेक्षणासाठी अडीच कोटीरुपयांचा निधी मंजूर करण्यातआला असून तातडीने सर्वेक्षणाचे |काम सुरू करण्याच्या सूचना रेल्वेमंत्रालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्याआहेत.नाशिक आणि डहाणू ही दोनशहरे रेल्वेने जोडण्याची संकल्पनामाजी खासदार अॅड. चिंतामणवणगा यांनी २५ वर्षांपूर्वी मांडलीहोती. त्यानंतरही दरम्यानच्याअवधीत तत्कालीन खासदारांनीडहाणू-नाशिक रेल्वेची भूमिकालावून धरली होती. 


आर्थिक विकासाला चालना मिळणार१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातदर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी ज्या ठिकाणी श्री रामवनवासात राहिले ते ठिकाण त्या पवित्र तीर्थस्थळाच्या दर्शनासाठीजाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वे मार्गाने आता दर्शन घेता येणारआहे. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे जोडली जातील पर्यायाने ग्रामीण पट्ट्यातील आर्थिक वाढीला आणि विकासाला चालना मिळणार आहे. वैष्णव यांनी अंतिम सर्वेक्षणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तातडीने

अंमलबजावणी करण्याच्या सूचना

रेल्वे प्रशासनाला केल्या आहेत.