गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
दि 23/9/24 सकाळी 10.30 प्राप्त माहितीनुसार MH37 न 6678ही दुचाकी अचानक स्लिप झाल्याने रोडच्या बाजूला पडली त्यामुळे भाग्येश रामदास मैश्री वय 27 व अथर्व वाघमारे वय 25 रा. दिघी (म्हसणी) हे जखमी झाले. अपघाताची माहिती समाजसेवक स्वप्निल चव्हाण यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांचे रुग्णसेवक नितीन पाटील यांना दिली.ते तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी मस्के सर यांनी त्याच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. त्यावेळी रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी दिघी येथील देवाभाऊ जिरे यांना संपर्क करून उपजिल्हा रुग्णालय बोलावले व त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यास सांगितले. त्यामुळे जखमी रुग्णाचे नातेवाईक सुद्धा तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहचले व यांनी पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे





Social Plugin