Ticker

6/recent/ticker-posts

धनगर समाजाचा दोन तास रास्ता रोको



अनुसूचित जमाती प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी दुपारी धनगर समाजाच्या वतीने वसंतरावजी नाईक चौक (परभणी फाटा) येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

चौदा पंधरा दिवस झाले पंढरपूर येथे राज्यव्यापी उपोषण सुरू आहे त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने सोमवारी दुपारी धनगर समाजाच्या वतीने परभणी हायवेवर वसंतरावजी नाईक चौक परभणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महसूल विभाग तहसील कार्यालय यंत्रने कडुन आंदोलकाचे निवेदन स्विकारण्यात आल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.