Ticker

6/recent/ticker-posts

आंबेगव्हाण -गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी -संतोष मेंगाळ



प्रतिनिधी- किसन भुतांबरे-ओतूर

सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेसाठी सकाळी दहा वाजता ग्रामसभा आयोजित केली होती यावेळी आंबेगव्हाण गावच्या प्रथम नागरिक व सरपंच सौ.अनिता डोके ग्रामसभेच्या अध्यक्षपदी होत्या.उपसरपंच श्री राजेंद्र गायकर . वन हक्क समितीचे अध्यक्ष- श्री अशोक डोके .  पैसा अध्यक्ष -श्री विलास मेंगाळ .माजी उपसरपंच दत्तात्रय गवांदे. श्री ज्ञानेश्वर कडाळे तसेच इतर सर्व ग्रामस्थ ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

         आंबेगव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री जोरवर यांनी मागील सभेचे वृत्तांत वाचून दाखविला .आणि पुढील काही विषयावरती चर्चा केली .स्थानिक लोकांनी कर वसुली करून सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले .जलजीवन मिशनचे   अपूर्ण काम याविषयी चर्चा केली. आंबेगव्हाण गाव पूर्ण पेसा क्षेत्रात असून गावातील पेसा निधी विषयी चर्चा केली .

ऐनवेळी चे अनेक प्रकारचे विषय घेऊन कामाबद्दल चर्चा करण्यात आली .  श्री दत्तात्रय गवांदे यांनी स्थानिक पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती पुनर्गठीत करण्याची ठराव मांडला. त्यानुसार श्री शुभम देवराम तांबे यांनी श्री संतोष सखाराम मेंगाळ यांचे नाव सुचविले .त्यास श्री संजय गायकर यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने अनुमोदन दिले .महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या इतरही सदस्यांची सर्वांनानुमते  निवड करण्यात आली .सर्व नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष मेंगाळ म्हणाले की सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे.त्याविश्वासमुळे मी सर्वांचा आभारी आहे.त्या विश्वासानेच मी जोमाने कामाला सुरुवात करणार आहे.                            तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य व मी आपल्या सहकार्याने ग्रामपंचायत हद्दीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या मधील समस्या, तंटे ,भांडणे ,हे वेगळ्या स्वरूपात असतात .ती आपण एकत्र येऊन मिटवली पाहिजे.आजकाल प्रत्येकाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यामधून कुटुंबा कुटुंबात वादविवाद वाढत चाललेले आहेत .त्याचे निराकरण स्थानिक पातळीवर करून प्रत्येकाला त्या समस्यातून निराकरण करणे ही आज काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आणि ती जबाबदारी पूर्ण झाली पाहिजे.हा सर्वांनी माझ्यावर टाकलेले विश्वास पूर्ण करण्यासाठी  आपणास आश्वासन देतो की माझे हातून गाव पातळीवर समस्या ,तंटे, वादविवाद मिटवण्याचा प्रयत्न केले जातील .असे श्री संतोष मेंगाळ म्हणाले.                   अशी माहिती श्री राजाराम गवांदे यांनी दिली