बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुणे येथील सार्थक वेलफेअर फौन्डेशन च्या टीमने श्री.शिवाजी विद्यालयास भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. विद्यालयाच्या नूतणीकरणासह निसर्गरम्य परिसर पाहून समाधान व्यक्त केले तसेच विद्यालयाच्या भौतिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयास पुणे येथील सार्थक फौन्डेशन च्या टीम ने भेट देऊन बहुउद्देशीय सभागृहाच्या पूर्ततेसाठी जागेची पाहणी केली सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अविनाश जंगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .मुख्याध्यापक आर.एम.डांगे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अर्चना जोशी, अंजली पिटके, संग्राम मदने, माजी उपसभापती लवकुमार मदने, कीर्तनकार पोपट महाराज भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती. सौ अर्चना जोशी म्हणाल्या, सार्थक वेल्फेअर फाउंडेशन ही सेवाभावी संस्था असून कंपनी सी एस आर फंडातून दहावी ते पदवी पर्यंत च्या गरीब ,गरजू , होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.यावर्षी ६५० विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त संधी चे सोने करावे.जिद्द चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यासाने ध्येयापर्यंत पोहचता येते. ज्येष्ठ उपशिक्षक सुनील वायदंडे यांनी आभार मानले
.jpg)




Social Plugin