अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी या शाळेची माझी विद्यार्थिनी गीता रामकिसन माळोदे या विद्यार्थिनीने आपल्या गरीब परिस्थितीवर जिद्दीने मात करून महाराष्ट्र पोलीस मध्ये तिची निवड झाली आहे.या निमित्ताने गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ अंबड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर मामा पवार यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र थोरात सर,श्री गणेश सपकाळ सर,श्री भागवत कडूळे सर,श्री गणेश वाघुंडे सर,श्री अमोल सोळुंके,श्री सतीश पाटील,श्री अभिषेक माळोदे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.





Social Plugin