Ticker

6/recent/ticker-posts

पुष्पावती विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा



प्रतिनिधी -किसन भुतांबरे-ओतूर 

28 सप्टेंबर 2024 हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो . महाराष्ट्र शासनाने सरकारी कार्यालय ,शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था अशा विविध स्तरावर साजरा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई 32 यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री बसवेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी सर्व शासकीय कार्यालयांना शासन निर्णयाची प्रत व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या लेटर पॅडवर निवेदन देण्यात आले होते .                              

28 सप्टेंबर हा दिवस पुष्पावती विद्यालय डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेत शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रतीक अकोलकर , शिक्षक प्रतिनिधी श्री जगन्नाथ गाढवे, श्री विठ्ठल शितोळे ,श्री के.डी .भुतांबरे ,श्री मंगेश कोंडार श्री पाटील दिनेश, श्री वैभव देशमुख ,श्री रतिलाल बागुल, श्री मंगेश डुंबरे ,श्री विजय काकडे, सौ शिल्पा भालेराव, श्री घोलप दत्तात्रेय ,सौ साधना तांबे, श्री शिवाजी उकिरडे,श्री रेवजी दुधवडे इत्यादी इत्यादी कर्मचारीवर्ग उपस्थित होते .                       

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता श्री किसन धोंडीभाऊ भुतांबरे यांनी सांगितले की 28 सप्टेंबर हा आजचा दिवस जागतिक आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन दरवर्षी सर्व स्तरावर साजरा केला जातो . जगातील अनेक देशांनी माहिती अधिकार हाच खरा प्रत्येक व्यक्तीचा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा हक्क आहे .  प्रत्येकाला देशातील ,राज्यातील, तसेच त्याच्या परिसरातील माहिती शासनाकडून मागून घेण्याच्या अधिकार आहे .प्रत्येक व्यक्ती देशाचा,राज्याचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी आपल्या मतदानाने निवडून देत असतो.              

आपले प्रतिनिधीच्या द्वारे शासन चालवले जात असते परंतु खरी शासन व्यवस्था ही नोकरदार वर्ग चालवत असतो परंतु नोकरदार वर्ग हा सेवक आहे. जनताही मालक आहे पण आज सर्वत्र मालकाला नोकरवर्ग जुमानतच नाही.       जनतेची सेवा करण्याऐवजी तो मालकाची आडवणूक  करतो.त्यामुळे भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजलेली आहेत.त्यामुळे त्याला मिळणारा पगार हा लोकांच्या करातून मिळतो.  तू जनतेसाठी आहे.सरकारच्या  पारदर्शक कारभारासाठी तू एकनिष्ठ काम करावे.   यासाठी या नोकर वर्गाला तू जनतेचा सेवक आहे.लोक खरे देशाचे मालक आहे.  दाखवून दिले पाहिजे.  यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय पातळीवरील समाज सेवक सन्माननीय श्री अण्णा हजारे यांनी 2005 साली भारताला ,भारतातील प्रत्येक व्यक्तीला माहिती अधिकार कायदा 2005 चा अंमलात आणून खरे स्वातंत्र्य मिळून दिलेले आहे .त्याचा उपयोग सर्व स्त्री- पुरुषांनी करायला पाहिजेत तरच लोकशाही सुदृढ होईल. म्हणून सर्व लहान थोरांनी माहिती अधिकाराचा उपयोग करावा

तरच देशाचा व समाजाचा विकास घडवून येईल 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन या निमित्ताने शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा इत्यादी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन हा माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.