चाळीसगाव - आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश. चाळीसगाव येथे अर्चनाताई पोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री संत नामदेव नगर पवार वाडी चाळीसगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी रवींद्र पोळ प्रदेश उपाध्यक्ष एस टी एस विभाग, रवींद्र पाटील प्रदेश प्रतिनिधी, शिवलाल साबणे प्रदेश प्रतिनिधी, सुधाकर कुमावत, नितीन परदेशी, नितीन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील गांधी चौक, पाटील वाडा, टिळक चौक, प्रभाग क्रमांक १०, अब्दुल रहेमान नगर, या परिसरातील शेकडो युवकांचा समावेश होता.
अर्चनाताई पोळ यांच्या हस्ते पुढील प्रमुख पदाधिकारी शेख इंद्रीस शेख इकबाल, जिल्हा उपाध्यक्ष एस टी एस विभाग, भिकन खाटिक शहर सरचिटणीस एस टी एस विभाग, अमीन शेख अन्सार शहर संघटक, यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी अर्चनाताई पोळ यांनी पक्ष संघटन व प्रत्येक प्रभागात काँग्रेस पक्षाची शाखा उघडण्यासंबंधी व आगामी विधानसभा निवडणुकां विषयी मार्गदर्शन केले रवींद्र पाटील सर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे आणि सर्वसमावेशक विचारसरणी याविषयी मार्गदर्शन केले या वेळी अरबाज शेख इकबाल, तन्वीर शेख, जोएब शेख इंद्रिस, मुदसिर शेख जाबीर, राहील शेख मेहमूद, तौसीफ आसिफ खान, अमान अजाज बागवान, उजेब शेख इकबाल, समीर रफिक बागवान, नायब शेख, अरबाज जाकीर शेख मंगेश वाकोडे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin