Ticker

6/recent/ticker-posts

ओझर्डे मध्ये गणेशविसर्जन मिरवणुक शांतेत पार पडली


वाई प्रतिनीधी राहुल पिसाळ 

ओझर्डे गावामध्ये सकाळ पासूनच घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली, सर्वत्र भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त गनांची चाललेली धावपळ पहावयास मिळाली त्यासोबतच दुपार पासून गावातील सर्व गणेश मंडळाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक निघाली त्यात राजधानी मित्र मंडळ, नवतरुण गणेश मंडळ, युवक क्रांती गणेश मंडळ, न्यू रण संग्राम मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, सहयोग मित्र मंडळ, मोरेश्वर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, मंगिरेश्र्वर मित्र मंडळ, गजराज मित्र मंडळ, राजगर्जना मित्र मंडळ, स्नेह संवर्धन गणेश मंडळ या सर्व गणेश मंडळाचा एका पाठोपाठ रथ शांततेत बाप्पाला निरोप देण्यासाठी मार्गस्थ झाले त्यामध्ये गावातील सर्व युवक कार्यकर्ते, भुईंज पोलिस स्टेशन चे ASI दत्तात्रय शिंदे साहेब, पोलिस पाटील मयूर कोदे, महाराष्ट्र विद्युत वितरणचे कनिष्ठ अभियंता पवन राठोड साहेब, वायरमन विक्रम चव्हाण, राहुल आडे, सुमित कांबळे यांनी लाईट ची चोख व्यवस्था केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक आणि आभर व्यक्त केले.