शेख अमिरपाशा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (नवी) टाकळी येथे 25 सप्टेंबर 2024, बुधवार रोजी सापांविषयी गैरसमज, अंधश्रद्धा आणि प्राण्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन MH 29 हेलपिंग हॅन्ड रेस्क्यू टीम, माहूरगड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. उपस्थित सर्पमित्रांनी सापांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासह त्यांच्या पर्यावरणातील भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले. या जनजागृती उपक्रमात प्रमुख सर्पमित्र म्हणून उपस्थित होते.मोहन मुरखें (जिल्हाध्यक्ष)इंद्रजित नेवारे,भीमाशंकर सूर्यवंशी,सुजल गाळवट,आकाश ठाकर,विकास ठाकर,सिद्धार्थ खडसे,प्रफुल खडसे,गौतम खडसे,अविनाश पठाडे,अक्षय करपाते,सैफाली शेख,ऋषिकेश कोट्टावार,अक्षय शेंद्रे कार्यक्रमात ग्रामस्थ मंडळींचीही उपस्थिती होती, ज्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सर्पमित्रांनी सापांविषयी असलेली अंधश्रद्धा आणि भीती दूर करून त्यांची संरक्षणात्मक भूमिका कशी महत्त्वाची आहे, यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमात मनापासून सहभाग घेतला आणि सापांविषयी नवीन ज्ञान मिळवले.
MH 29 हेलपिंग हॅन्ड रेस्क्यू टीमने जनजागृती कार्यक्रमाद्वारे समाजातील अंधश्रद्धा कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश दिला.





Social Plugin