वीजबिलातील बचत भक्तांच्या सुविधांसाठी; २० किलोवॅटची यंत्रणा कार्यान्वित
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्रातीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने २० किलोवॅटची सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केली. दररोज ८०, तर महिन्यात २४०० युनिट वीजनिर्मिती होणार असल्याने ट्रस्टचा वीजबिलावर होणारा लाखोंचा खर्च वाचणार आहे. यातून भाविकांना आणखी सुविधा देण्यात येतील, असे अध्यक्ष रणधीर जाधव यांनी सांगितले.महाराष्ट्रासह देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या मठाधिपती, अध्यक्ष आणिविश्वस्तांच्या संकल्पनेतून मंदिरावर २० किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंगळवारी त्याचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी मठाधिपती श्रीमंतसुंदरगिरी महाराज, अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सौर ऊर्जा संचालक राहुलफडतरे, सचिव विशाल माने आणि मान्यवर उपस्थित होते.या वेळी श्री. जाधव म्हणाले, "मंदिरासाठी लागणारी वीज सौरऊर्जा यंत्रणेद्वारे उपलब्ध होणार असल्याने महिन्याला येणाऱ्या ४० हजार रुपयांच्या वीजबिलाची बचत होणार आहे. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचा परतावा दीड ते दोन वर्षांत मिळणार आहे. वीजबिलाचा हजारोंचा खर्च वाचणार असल्याने भाविकांना आणखी सोयीसुविधा देण्यात येणार आहेत."राहुल फडतरे यांनी सौर ऊर्जा यंत्रणा फायदेशीर असल्याचे सांगून त्याबाबतची तांत्रिक माहिती दिली.





Social Plugin