तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रम्हा व्हॅली येथे (दि.१०) रोजी क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा नासिक विभाग, नासिक यांच्या मार्फत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या क्रिडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा ठाणापाडा तालुका त्र्यंबकेश्वर तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शिरसगाव तालुका त्र्यंबकेश्वर येथील खेळाडू विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन करुन जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मजल मारली.
शासकीय माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा ठाणापाडा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या शाळेतील खेळाडू विद्यार्थी १९ वर्षाआतील मुलांच्या कबड्डी संघाने अंतिम सामन्यात चुरशीची लढत देत एकहाती विजय खेचून आणला. व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मजल मारली. या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर क्षीरसागर, संघ व्यवस्थापक सुरेंद्र शेंडे, सई भवर, हिरामण झिरवाळ, जया बिऱ्हाडे, अधीक्षक विष्णुकांत हिंगडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शिरसगाव तालका ञ्यंबकेश्वर जिल्हा नासिक या शाळेच्या खेळाडु विद्यार्थीनीनी क्रीडा व युवकसेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा नासिक विभाग, नासिक यांच्या मार्फत ञ्यंबकेश्वर येथे आयोजित तालुका स्तरीय १७ वर्षाआतील मुलींच्या कबड्डी संघाने चुरशीची लढत देत घवघवीत यश संपादन करुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मजल मारली. या खेळाडू विद्यार्थ्यीनींना क्रिडा मार्गदर्शक सिद्धार्थ भोगले, संघ व्यवस्थापक हिरामण टोपले, हरिश धुम, अधिक्षिका पुणम बावणे, अधिक्षक अरुण बागले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या दोन्ही शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यीनींचे तसेच क्रिडा मार्गदर्शकांचे सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा. अर्पितजी चौहान (भा.प.से.), शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव भांगरे ठाणापाडा शाळेचे मुख्याध्यापक अशोक चौरे, शिरसगाव शाळेचे मुख्याध्यापक दिपक भास्कर, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण महाले शिरसगाव, वनिता भोये ठाणापाडा आदिंनी अभिनंदन केले





Social Plugin